चोऱ्या करुन उघडपणे फिरायचा...असा लागला पोलिसांच्या हाती

Foto

औरंगाबाद- एमआयडीसी वाळूज पोलिसांनी कामगार चौकात सापळा रचत सराईत मोटर सायकल चोर सय्यद हनिफ याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याच्या कडून अजूनही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मूळचा पंढरपूर येथील रहिवाशी असलेला ३० वर्षीय सय्यद सिराज सय्यद हनिफ हा सध्या दौलताबाद तालुक्यात एका विटभट्टीवर राहतो. तो बुधवारी(ता.१९) सकाळी वाजेच्या दरम्यान वाळूज औद्योगिक नगरीत चोरीची दुचाकी घेऊन येणार आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना खबरीने दिली होती. मिळालेल्या माहिती वरून पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने कामगार चौकात सापळा रचला व आरोपी सय्यद ला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता चोरी केलेल्या दुचाकी पंढरपूर येथे घराजवळ लपून ठेवल्याची माहिती त्याने दिली. ती वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..